पुणे: पालिकेचा फोलपणा…! गेली मुले कुणीकडे ?

संग्रहित फोटो

1 लाख

76 हजार 400
माध्यमिक विद्यार्थ्यांची पटसंख्या

60 हजार
प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या

20 टक्के
विद्यार्थी नियमित गैरहजर

16 कोटी रु.
डीबीटी साहित्य खर्च

माध्यमिक शिक्षण विभागाची पटसंख्या 60 हजारांवर

पुणे – महापालिका शाळांमधील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील मुलांची पटसंख्या 1 लाखावर असल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा फोलपणा उघड झाला आहे. मागील शैक्षणिक वर्षात (जानेवारी 2018) मध्ये पालिकेच्या शाळांमध्ये माध्यमिक विभागात 76 हजार 400 विद्यार्थी असून त्यातील 20 टक्के विद्यार्थी नियमित गैरहजर असल्यामुळे माध्यमिक विभागात फक्‍त 60 हजार विद्यार्थीच शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी गुरूवारी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाने ही माहिती दिल्याचे डॉ. धेंडे यांनी स्पष्ट केले. मागील शैक्षणिक वर्षात “डीबीटी’ योजना राबविताना पालिका प्रशासनाने प्राथमिक विभागाच्या सुमारे 93 हजार मुलांच्या “डीबीटी’ कार्डवर रक्कम जमा केल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे जर गैरहजर विद्यार्थ्यांसह पटसंख्याच 76 हजार असेल तर 17 हजार मुले गेली कुठे? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या शाळांमध्ये जानेवारी 2018 ची पटसंख्या पाहता प्राथमिक विभागात 76 हजार 400 तर माध्यमिक विभागात 16 हजार विद्यार्थी आहेत. त्यांना “डीबीटी’द्वारे साहित्य देण्यात आले असून त्यासाठी 16 कोटींचा खर्च आला आहे. तर या मुलांमधील सुमारे 20 टक्के मुलांचे पालक हे कामानिमित्ताने फिरतीवर असल्याने 20 टक्के विद्यार्थी नियमित गैरहजर असतात. त्यामुळे प्रत्यक्षात पटसंख्या ही 20 टक्के कमी असल्याचे सांगितले. त्यामुळे शाळांच्या पटसंख्येत तफावत असल्याने तातडीने यावर उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याचे डॉ. धेंडे यांनी स्पष्ट केले.

आता बायोमेट्रिक हजेरी?
महापालिका शाळांचे समायोजन टाळण्यासाठी काही मुख्यायापक मुलांची संख्या फक्‍त रजिस्टरवर दाखवित आहेत. प्रत्यक्षात मुले शाळेतच येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये मुलांची बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशा सूचना प्रशासनास या बैठकीत देण्यात आल्या. सध्या पालिकेच्या सर्व शाळांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीन असून त्याच मशीनवर विद्यार्थी पटसंख्याही घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निश्‍चित पटसंख्या समोर येण्यास मदत होणार आहे.

“डीबीटी’तील साहित्य वाटपावर प्रश्‍नचिन्ह ?
शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीमुळे शिक्षण विभागाकडून मागील वर्षी राबविण्यात आलेल्या “डीबीटी’ योजनेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून सुमारे 1 लाख मुलांना साहित्य वाटल्याचा दावा केला जात आहे. त्यात शेवटच्या टप्प्यात अनेक मुलांची “डीबीटी’ कार्ड तांत्रिक कारणांमुळे बंद पडल्याने मुलांना शैक्षणिक साहित्य मिळण्यात उशीर नको, म्हणून ते शाळेत वाटण्यात आले असून त्या साहित्याची बिले ठेकेदारांना दिली जात आहेत. त्यामुळे आता “डीबीटी’च्या साहित्यवाटपावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जर मुलांची पटसंख्या 60 हजार होती, तर 93 हजार कार्डवर पैसे कसे टाकण्यात आले? तर कार्ड चालत नसल्याचे सांगत खरंच मुलांना साहित्य देण्यात आले का? ज्या मुलांचे कार्ड चालत नव्हते, ती मुले प्रत्यक्षात होती का? असे अनेक प्रश्‍न यामुळे उपस्थित झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)