पुणे: पालिका शाळेतील मुलींना मोफत सॅमिटरी नॅपकिन

5 वी ते बारावी पर्यंतच्या मुलींना देणार सुविधा

पुणे – महापालिका शाळांमधील पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना पालिकेच्या वतीने मोफत सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या प्रस्तावास बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या पूर्वी महापालिकेकडून 8 वी ते दहावी पर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या मुलींना ही सुविधा देण्यात येत होती. तसेच मागील वर्षात त्यात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचे महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नगसेविका वृषाली चौधरी, रुपाली धाडवे तसेच मनिषा लडकत यावेळी उपस्थित होत्या.

नवले म्हणाल्या, महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात 23,612 मुलींना ही सुविधा दिली जाणार आहे. या पूर्वी आठवी ते दहावीच्या 10 ते 12 हजार मुलींना ही सुविधा देण्यात येत होती. त्यासाठी प्रशासनाकडून माहिती घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पालिकेच्या शाळांमध्ये या नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पाबाबत प्रशासनाकडून सर्व माहिती घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)