पुणे: पालिका रुग्णालयातही मिळणार “एमआरआय’ सुविधा

गर्भवतींना मोफत मिळणार सोनोग्राफी सेवा

पुणे – पद्मावती येथील महापालिकेच्या शिवशंकर पोटे रुग्णालयात लवकरच “एमआरआय’ची सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेंअंतर्गत या तपासणीसाठी निश्‍चित केलेल्या दरांपेक्षा 8 टक्के कमी दराने ही सुविधा देण्यात येणार आहे. अत्याधुनिक सोनोग्राफी केंद्राचा लाभ देखील रुग्णालयांना मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रुग्णालयात सोनोग्राफीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना ही तपासणी मोफत असणार आहे. या वैद्यकीय सेवेचे उद्‌घाटन 16 जून रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी ही बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. माजी महापौर दत्ता धनकवडे, महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, डॉ.संजीव वावरे या वेळी उपस्थित होते.

कदम यांनी स्थायी समिती अध्यक्षा असताना, या प्रकल्पासाठी 2 कोटींची तरतूद केली होती. त्या निधीतून जर्मन बनावटीची अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली असून खासगी संस्थेच्या माध्यमातून पीपीपी तत्वावर ही सुविधा पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात एमआरआय, डिजिटल एक्‍स-रे, तसेच सोनोग्राफीची सुविधा असणार असणार आहे. तर महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही सुविधा मोफत असणार असून संबधित संस्थेच्या माध्यमातून पुढील 10 वर्षे ही सुविधा दिली जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले. या शिवाय, याच परिसरात उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंदाच्या भित्तीचित्रांचेही यावेळी अनावरण केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)