पुणे : पालिका अंदाजपत्रकाला मुदतवाढ मिळण्याची मागणी

मुख्यसभेत विरोधकांची घोषणाबाजी

पुणे- महापालिका अंदाजपत्रकाला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करत विरोधकांनी बुधवारी महापालिका मुख्यसभेत घोषणाबाजी केली. अनेक विकासकामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे निधी लॅप्स होणार असल्याने अंदाजपत्रकाला मुदतवाढ मिळावी अशी विरोधकांची मागणी होती.

आधीच स्वपक्षीयांना जास्त तरतूद देण्यात आली आहे आणि विरोधकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. त्यामुळे किमान जी तुटपुंजी तरतूद मिळाली आहे, ती कामे पूर्ण करायची आहेत. अशी विरोधकांची मागणी होती.

एका बाजूला 200 कोटी रुपये कर्ज काढायचे आणि दुसरीकडे साडेतीनशे कोटी रुपये ठेव म्हणून ठेवण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. तो पैसा विकासकामांना वापरावा, अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान, अंदाजपत्रकाला मुदतवाढ देण्यासंदर्भात सर्व गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका मुख्यसभेत सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)