पुणे – पादचारी महिलेचे मंगळसूत्र लाबविले

पुणे – आपल्या मुलीसह डी-मार्ट येथे खरेदी करण्यासाठी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकामारून चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कात्रज बायपास हायवे, आंबेगाव येथे घडली. या प्रकरणी चोरट्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुरा वैभव कुऱ्हाडे (34, आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी या आपल्या मुलीसह डी-मार्ट येथे खरेदी करण्यासाठी पायी चालल्या होत्या. यावेळी अचानक एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला व हिसकामारून त्यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला. या आरोपीसोबत आणखी एक इसम गाडी घेऊन त्यांच्यासोबत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अधीक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)