पुणे: पाऊस गेला कोठे? सर्वांच्याच पोटात गोळा

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको
पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शिवाय अजून पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

वाटचाल मंदावली : उकाड्यात प्रचंड वाढ

पुणे – मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी दमदार एन्ट्री करणाऱ्या मोसमी पावसाची थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पोटात गोळा आला आहे. तर, दि. 17 जूनदरम्यान पाऊस जोर पकडेल, असा अंदाज असून पावसात मोठा खंड पडण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

राज्यात 8 जून रोजी पावसाचे आगमन झाले, पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. त्यामुळे लवकरच तो राज्य व्यापेल, अशी आशा होती. मात्र, अल्पावधीतच पावसाची पुढची वाटचाल मंदावल्याने आता चिंता निर्माण झाली आहे. तर, दुसऱ्या बाजूला खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. शेत-शिवारदेखील सज्ज आहे. पण, पावसाने दगा दिल्याने शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे पण पाऊस नाही. त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत तळकोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मात्र, इतर ठिकाणी हवामान कोरडेच राहण्याचा अंदाज आहे.

मान्सून वितरणाच्या शाखा कमजोर झाल्या आहेत. त्यामुळे देशभरात पावसाच्या वाटचालीस प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय सध्या बंगालच्या उपसागरात पावसाची वाटचाल मंदावली आहे. त्यामुळे पाऊस लांबला आहे. साधारत: 20 ते 22 जूनदरम्यान राज्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे. – श्रीनिवास औंधकर, संचालक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)