पुणे: पहिल्या वर्षी 100 शाळांमध्येच ई-लर्निंग

पहिल्या टप्प्यात 100 शाळा

महापालिकेकडून 247 मधील पहिल्या टप्प्यात केवळ 100 शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमधील पट संख्या जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात मराठी, इंग्रजी, उर्दू तसेच कन्नड शाळांचा समावेश आहे; तर उर्वरीत शाळांमध्येही टप्प्या टप्प्याने हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पहिल्या टप्प्यात नववी आणि दहावीचे वर्ग वगळण्यात आले आहेत. तसेच, ज्या शाळांमधील पटसंख्या कमी आहे अशा शाळाही पहिल्या टप्प्यात वगळण्यात आल्या आहेत.

अभ्यासक्रम तपासणीसाठी 80 जणांची जंबो समिती

पुणे – महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या 100 शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून ई-लर्निंग प्रकल्प सुरू केला जाणार आहे. मागील वर्षी महापालिकेने 21 कोटी रुपयांच्या ई-लर्निंग प्रकल्पास मान्यता दिली होती. त्यानुसार, 287 शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार होता. मात्र, प्रशासनाने आता पहिल्या वर्षी केवळ 100 शाळा निश्‍चित केल्या असून त्यातही 1 ली ते आठवी पर्यंतच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या जास्त असल्याने त्यांची निवड करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे येत्या 15 जूनपासून या प्रकल्पांची अंमलबजावणी होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे; तर या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेले व्हर्चुल क्‍लासरूम (स्टूडीओ) शिक्षण विभागाच्या कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर उभारले जाणार असून त्यासाठीची जागाही निश्‍चित करण्यात आली आहे.

-Ads-

अभ्यासक्रम तपासणीसाठी अखेर समिती स्थापन
महापालिकेकडून ई-लर्निंग प्रकल्पाचे काम भारत दूर संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमास बालभारतीची मान्यता नसल्याने हा प्रकल्प अडचणीत आला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी एक बैठक घेऊन बीएसएनएलचा अभ्यासक्रम तपासण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशास तीन महिने झाले तरी अद्याप समिती नेमण्यात आलेली नव्हती. अखेर प्रशासनाने मागील आठवड्यात ही समिती नेमली असून त्यात 80 ज़णांचा समावेश आहे. यात संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उप शिक्षण प्रमुख यांचा समावेश आहे. या समितीला पुढील 20 दिवसात हा अभ्यासक्रम तपासून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)