पुणे: पर्यटकांनो, स्वत:ची काळजी घ्या

वनविभागाचे आवाहन : यंदा विशेष खबरदार घेणार

पुणे – पावसाळा, म्हणजे पुणेकरांसाठी पर्यटनाची मोठी पर्वणीच. शहर परिसरातील विविध पर्यटनस्थळांना निसर्गप्रेमी आवर्जून भेट देतात. वीकेंडला तर सर्वच पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी असते. पण, अनेकदा पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अपघातदेखील घडले. ते टाळण्यासाठी आणि पर्यटकांना आनंद सुरक्षितपणे लुटता येण्यासाठी यंदा वनविभाग विशेष खबरदारी घेणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे आणि लगतच्या पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणांची नोंद घेऊन तेथे संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, मुळशी, वडगाव मावळ अशा परिसरांत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यातच गेल्या वर्षी सिंहगड येथील घाटात दरड कोसळली होती. तर इतर ठिकाणी संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडले. यंदा अशा घटना टाळण्यासाठी वनविभाग सतर्कतेचे पाऊल उचलले आहे. या सर्वच पर्यटनस्थळी संरक्षण कठडे, सूचना फलक लावले जात आहेत. विशेष म्हणजे, यंदा अशा ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमले जाणार आहेत.
सहायक वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले, “पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विभगाकडून विविध खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहे. मात्र, अनेकदा अतिउत्साहाच्या नादात पर्यटक दिलेल्या सूचनांचे पालन न करता धोका पत्करतात. विशेषत: “सेल्फी’साठी धोकादायक ठिकाणी जाणे, रेलिंग ओलांडून पुढे जाणे असे प्रकार घडून यामुळे अपघात घडल्याचे आपण पाहतो. त्यामुळे पर्यटकांनीदेखील स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)