पुणे: पत्नी व मुलाच्या खूनप्रकरणी आणखी एकास अटक

पुणे- प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको, म्हणून पत्नीसह आठ महिन्यांच्या बाळाची सुपारी देवून खून केल्याप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.

सावन नारायण जाधव (रा. जयराम नगर, हिंडवडी) असे कोठडी देण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी खून झालेल्या महिलेचा पती व त्यांच्या प्रेयसीसह चौघांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पती दत्ता वसंत भोंडवे ( रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे), प्रशांत जनगन भोर (रा. माण रोड हिंजवडी, मुळ रा. इगतपुरी), पवन नारायण जाधव (रा. हिंजवडी) आणि प्रियसी सोनाली बाळासाहेब जावळे (रा. आदर्श कॉलनी वाकड, मुळ रा. पाथर्डी, अहमदनगर) अशी पोलीस कोठडी देण्यात आलेल्यांची नावे आहेत. खून झालेल्या आईचे नाव अश्विनी आणि बाळाचे नाव अनुज असे आहे. 9 जूनच्या रात्री दहाच्या सुमारास मुळशी तालुक्‍यातील जांबे गावच्या पुढे नेरे गावच्या दिशेला कोयतेवस्तीजवळ ही घटना घडली होती. लुटीसाठी कोणी अज्ञातांनी आपल्यावर हल्ला करून पत्नी व बाळाचा खून केला. जवळचे 50 हजारही पळवून नेल्याचे आरोपी पती दत्ता भोंडवे यांनी पोलिसांना सांगितले होते. तसेच स्वत:वर वार झाल्याचे भासवून रुग्णालयातही दाखल झाला होता. मात्र बोलण्यातील विसंगतीतून तो बारा तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)