पुणे: तरुणाला 1 लाख 80 हजाराला गंडा

पुणे – तरुणास पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन व ब्रेसलेट असे 1 लाख 80 हजाराला लुटण्यात आले. याप्रकरणी दुचाकीवरील चार व्यक्तींविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संकेत अग्रवाल (30, रा. वानवडी) हे दुचाकीवरून भैरोबानाला येथून चालले होते. यावेळी त्यांना एका दुचाकीवरील दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून थांबवले. यानंतर त्यांचे आणखी दोन साथीदार दुचाकीवरून आले. त्यांनी जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे चेन व हातातील सोन्याचे ब्रेसलेट काढून घेतले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)