पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील रेल्वे गेट 36 तासांसाठी बंद

नीरा- पुणे- कोल्हापूर लोहमार्गावरील नीरा (ता. पुरंदर) शहरानजीक थोपटेवाडी येथील रेल्वे फाटक (गेट क्र. 27 कि. मी.) परिसरात लोहमार्गाच्या रुळाच्या दुरुस्तीचे आणि निरीक्षणाच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी (दि. 24 आणि 25) दोन दिवसांत 36 तास पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाच्या वतीने वाठार येथील लोहमार्ग वरिष्ठ अभियंत्यांनी अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हा-नीरा दरम्यान थोपटेवाडी रेल्वे क्रॉसिंगमध्ये रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळ दुरुस्ती व रस्त्यावर निर्माण झालेला समतोल दुरुस्त करण्यात येणार आहे. परिसरातील लोहमार्गाचे निरीक्षण करून रेल्वे रुळांची पाहणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 24) सकाळी सात वाजल्यापासून जेजुरी-नीरा दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्गावरील वाहनांची वाहतूक शनिवारी (दि. 25) संध्याकाळपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.

  • पर्याय मार्ग
    अवजड वाहनांसाठी नीरा-मोरगाव-जेजुरी आणि सासवड तसेच लोणंद-शिरवळ-कापूरहोळ या मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. छोट्या वाहनांसाठी नीरा-गुळुंचे-राख-कोळविहिरे-जेजुरीमार्गे, तसेच नीरा-जेऊर-मांडकी-वीर-सारोळा मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने व उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)