पुणे न्यायालयात देशातील पहिली ई-पेमेंट सुविधा

डिसेंबरपासून संकेतस्थळ सुरू : दंड व कोर्ट फी भरण्यातील गैरप्रकार थांबणार

पुणे – न्यायालयीन दंड, शुल्क आणि इतर रकमा भरणे आदी गोष्टी पक्षकार आणि वकिलांना सोयीस्कर व्हावे. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी न्यायालयीन व्यवस्थेमधील देशातील पहिली ई-पेमेंट सुविधा पुणे जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या या उपक्रमात सुरुवातील 2 हजार रुपयापर्यंतची रक्‍कम मोफत भरता येणार आहे. त्यावरील रकमेला ठराविक फी असून येत्या 15 डिसेंबरपासून संकेतस्थळ सुरू होणार आहे. Pay.ecourt.gov.in/epay असे या संकेतस्थळाचे नाव आहे.

पोटगीची रक्कम, विविध प्रकारचे भाडे, न्यायालयीन दंड, कोर्ट फी, अशा विविध प्रकारच्या रकमा दुपारी तीनपर्यंत न्यायालयात भरणे आवश्‍यक असते. त्यासाठी संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष न्यायालयात येऊन रक्कम भरावी लागते. न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी तीनपर्यंत संबंधित रक्कम न भरण्यास पक्षकार आणि वकिलांना दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबावे लागते. मात्र, ई-पेमेंट सुविधेमुळे 24 तास पैसे भरता येणार आहे. तसेच त्यासाठी प्रत्यक्ष न्यायायलयात येण्याची देखील गरज राहणार नाही. सध्या ही सुविधा केवळ जिल्हा न्यायालयापुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. यापुढील काळात त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. 15 डिसेंबर रोजी न्यायाधीश ए. के. मेनन यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्‌घाटन करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक डॉ. अतुल झेंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

केस नंबरवर मिळणार सर्व माहिती
पैसे भरण्यासाठी केवळ केस नंबर टाकावा लागणार आहे. संकेतस्थळावर खटल्याची सर्व माहिती आधीच अपलोड करण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेत ही सुविधा असणार आहे. पैसे भरताना संकेतस्थळावर कोणतीही अडचण येणार नाही, याची देखील काळजी घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)