पुणे – नीलायम पूल बंद; चौकाची कोंडी

– “पीक अवर्स’मध्ये वाहतुकीचा ताण : अतिरीक्त पोलीस तैनात

पुणे – जलवाहिनी टाकण्यासाठी पर्वती पायथ्याजवळील नीलायम पूल दि. 7 जुलैपर्यंत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. एस. पी. कॉलेज चौक, वडगाव -धायरी येथून सारसबागेशेजारील सावरकर चौकातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला. सकाळी किरकोळ पाऊस आणि कार्यालयीन वेळेत (पीक अव्हर्स) कोंडी होऊन वाहतूक संथ होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्वती जलकेंद्र ते लष्कर जलकेंद्रापर्यंत जलवाहिनी टाकणे सुरू आहे. त्यामुळे नीलायम पुलावरील वाहतूक बंद आहे. 29 जून ते 5 जुलै दरम्यान हे काम सुरू राहणार आहे. दरम्यान, पुलावरील वाहतूक बंदची माहिती अनेक वाहनचालकांना नसल्यामुळे पहिल्याच दिवशी वाहतूककोंडीचा त्रास झाला. एस. पी. चौक, टिळक रोड , सहकारनगर याठिकाणावरुन येणारे नागरिकांकडून नीलायम पुलाचा वापर केला जातो. मात्र, बंदमुळे एस. पी. चौकातून नीलायम पुलामार्गे जाणारी वाहतूक बंद करुन शेजारील रस्त्यावरुन सावरकर चौकामार्गे ती वळविण्यात आली आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावर वाहनांचा ताण वाढला. परिणामी, सावरकर चौकामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कोंडीचा फटका सहन करावा लागला.
तर शाहू कॉलेज चौकाकडून नीलायम पुलावरुन एस. पी. चौकात जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. दरम्यान, पूल बंद केल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात होते. याठिकाणी नियमनासाठी अतिरीक्त पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. तर ठिकठिकाणचे सिग्नल यंत्रणा बंद करुन त्याचे मॅन्युअली नियमन केले जात होते.
———–
नीलायम पुलावरील वाहतूक 29 जूनपासून बंद राहणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने 20 अतिरिक्त कर्मचारी नेमले आहेत. यासाठी सकाळी 7 ते दुपारी 2 व दुपारी 2 ते रात्री 10 अशा दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. “पीक अवर्स’मध्ये थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. परंतु, दिवसभर वाहतूक सुरळीत होती.
– मुरलीधर करपे, वाहतूक पोलीस निरीक्षक, दत्तवाडी.
————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)