पुणे : निलंबित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

चित्रिकरण सोशल मीडियावर टाकण्याची दिली होती धमकी

पुणे – महिलेवरील लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण करुन सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशेष शाखेतील निलंबित पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्कार व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आसिफ कादेर पटेल (47, रा. भवानी पेठ) , सनी सुरेश डिंबर व चिराग त्रिवेदी अशी आरोपींची नावे आहेत. पीडित महिला व आसिफ पटेल हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पटेलने पोलीस असल्याचा फायदा घेत वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. त्याचे चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. यानंतर त्याच्या दोन साथीदारांनीही तिच्यावर अत्याचार करत जातीवाचक शिवीगाळ केली. यासंदर्भात पीडितेने 2017 मध्ये पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे तक्रार दिली होती.

मात्र, यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने तिने राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांना खुलासा देण्याचे आदेश दिले होते. यानंतर आसिफ पटेलला तातडीने निलंबित करण्यात आले. यानंतर अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)