पुणे – नियमभंगाच्या कारवाईसाठी अत्याधुनिक मशीन

– 250 अत्याधुनिक मशिन्स दाखल

– नियमभंग करणारांचे फोटो, चित्रीकरण होणार

पुणे – वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असून कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. वाहतूक विभागाकडून कारवाईसाठी वापरण्यात येणाऱ्या जुन्या ई-मशीन्सला मर्यादा येत होत्या. मात्र, नुकत्याच वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात फोर-जी अत्याधुनिक 250 मशीन्स दाखल झाल्या असून मशिनव्दारे फोटो, व्हिडीओ चित्रीकरण होणार आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप बसेल, असा विश्‍वास वाहतूक पोलिसांकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

 

शहरातील चौका-चौकांत वाहतूक पोलीस तैनात आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी त्यांच्याकडे आजवर एम-स्वाईप मशीन्स होते. मात्र, जुन्या पद्धतीच्या या मशीनन्समध्ये फोटो, व्हिडीओ काढण्यास मर्यादा येत होत्या. या पार्श्‍वभूमीवर ऍक्‍सीस बॅंकेच्या मदतीने वाहतूक पोलिसांना फोटो, व्हिडीओ काढता येऊ शकणाऱ्या अत्याधुनिक अशा 250 मशीन्स उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे नियमभंग करणाऱ्यांचे चित्रीकरण होऊ शकणार आहे. त्याचबरोबर पुरावा म्हणून हे वापरणे शक्‍य होणार असल्याने बेशीस्त वाहनचालकांना चाप बसेल, असा विश्‍वास वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
3 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)