पुणे-निजामाबाद पॅसेंजर 23 मेपर्यंत रद्द

पुणे – सोलापूर विभागातील श्रीगोंदा व बेलवंडी स्थानकांदरम्यान रेल्वे विभागाकडून सब-वे चे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे 51421/51422 पुणे-निजामाबाद-पुणे ही पॅसेंजर 23 मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

सब-वे चे काम सुरू असल्याने काही दिवस ही पॅसेंजर बंद राहणार आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी दौंड व पुणे स्थानकांदरम्यान एक विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी 26 ते 30 एप्रिलदरम्यान धावणार आहे. दौंड स्थानकातून सायंकाळी 6.30 वाजता सुटणार असून ती रात्री 8.55 ला पुण्यात पोहोचणार आहे. दरम्यान, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)