पुणे – निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा

अरविंद शिंदे यांची मागणी : महापौरांना पत्र

पुणे – पाचशे बकेटस खरेदी केले जातात आणि बाकीच्या बकेट खरेदी करण्यापेक्षा त्याचे पैसे सभासदांकडून मागितले जातात, असा गंभीर आरोप महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केला होता. या आरोपाची चौकशी करण्याची मागणी महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी महापौरांना दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

30 जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निंबाळकर यांनी वरील आरोप केला होता. त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे जर महापालिकेत घडत असेल तर त्या अतिरिक्त आयुक्तांना हा प्रकार आधिपासूनच माहिती आहे. त्यामुळे असे आरोप करण्याऐवजी त्यांनी संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित होते. ती कारवाई न करता केवळ आरोप करणे हे अनाकलनीय आहे. त्यांना हा प्रकार माहीत असताना ते काहीच करत नाहीत किंवा केले नाही हे यावरून सिद्ध होते, असेही शिंदे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच असे प्रकार घडत असल्यास हा प्रकार बकेटस खरेदी संबंधित महापालिकेचे सभासद, अधिकारी, ठेकेदार यांच्या संगनमताशिवाय होऊ शकत नाहीत. अशाप्रकारे आरोप होत असतील तर हा महापालिकेतील सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. यामध्ये तथ्य असल्यास या प्रकरणाची चौकशी करून तातडीने संबंधितांवर कारवाई करावी. निंबाळकर यांनी केलेल्या आरोपामुळे नागरिक सर्वच सभासदांकडे शंकेच्या नजरेने पाहात आहेत. या प्रकरणी योग्य कार्यवाही न झाल्यास सर्व सभासद या भ्रष्टाचारात समाविस्ट आहेत असा समज होणार आहे. त्यामुळे आरोपाची तातडीने चौकशी करून त्याचा अहवाल आम्हाला द्यावा, अन्यथा या प्रकरणी आपल्या कार्यालयात येऊन आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी, असाही इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)