पुणे-नाशिक रस्त्यावर उभा असलेला ट्रक चोरला

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील पेठ येथे बायपास रस्त्याजवळील पंचवटी हॉटेलसमोर पुणे-नाशिक रस्त्यावर उभा असलेला एक आयशर कंपनीचा ट्रक अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना गुरुवार (दि. 15) रोजी रात्री घडली आहे.
या प्रकरणी उत्तम विठ्ठल नवले (रा. पिंपरी पेंढार ता. जुन्नर) यांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात ट्रक चोरीची फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे-नाशिक रस्त्यावर ट्रक (एम. एच. 14 ई. एम. 5371) उभा होता. याची किंमत 9 लाख 90 हजार रुपये असून ट्रकच्या पुढील केबीनवर भैरवनाथ प्रसन्न व नॅशनल परमिट असे मराठीत लिहलेले असून पाठीमागे लाकडी बॉडी असलेला जुवा आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कोणास काही माहिती असल्यास त्यांनी मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय गिलबिले यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)