पुणे-नाशिक महामार्ग पोलिसांची जीपविना पंचाईत

संगमनेर – पुणे-नाशिक औद्योगिक व शैक्षणिक शहरांकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मोठा ताण असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे महामार्ग पोलिसांकडे गेल्या दोन महिन्यांपासून जीप नसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

नगर जिल्ह्यात महामार्ग पोलिसांच्या डोळासणे, बाभळेश्‍वर, केडगाव व तीसगाव येथे चौक्‍या आहेत. त्यापैकी संगमनेर तालुक्‍यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे चौकीत एकूण सोळा पोलीस कर्मचारी व पीएसआय दर्जाचा एक अधिकारी नेमणुकीस आहे. या खात्याचा नगर येथे पीआय दर्जाचा अधिकारी असतो. महाराष्ट्रात पुणे व ठाणे येथे एसपी दर्जाचा अधिकारी काम पाहतो. डोळासणे चौकीतील दररोज आठ पोलीस कर्मचारी, एक अधिकारी महामार्गावर ड्युटीला असतात.
संगमनेर तालुक्‍यातील वडगावपान टोलनाका ते अकोले तालुक्‍यातील बारी घाटापर्यंतचा रस्ता तसेच डोळासणे चौकीपासून दुतर्फा 25 किलोमीटर अंतरावरील आळेखिंड ते कऱ्हेघाट हा रस्ता या चौकीच्या कार्यक्षेत्रात आहे. या मार्गावरील रस्ते सुरक्षा, अपघात, ओव्हलोड मालट्रक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणारी वाहने, वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या चौकीवर आहे. यासाठी त्यांना रात्रंदिवस धावपळ करावी लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)