खेड घाटात कंटेनर-खासगी बसचा अपघात : नऊ जण जखमी; तिघांची प्रकृती गंभीर

राजगुरूनगर: पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास कंटेनर व चाकण कंपनीत जाणाऱ्या कामगारांच्या बस यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. त्यात चालकासह तीन जण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूकडून मोठी वाहतूककोंडी झाली.

कामगाराच्या बसचाचालक सुनील भालेराव, अविनाश चिखले, रमेश बांगर, धनेश कानडे, नितीन भोर, संतोष काळे, तुषार ढवळे, धनंजय वाबळे, ओंकार गावडे असे नऊ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघेजण गंभीर आहेत. त्यांच्यावर राजगुरुनगर व मंचर येथे खासगी रुगणालयात उपचार सुरु आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर येथून चाकण येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगारांच्या बस (एमएच 14 बीए 9626) व पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर (एमएच 12 पिक्‍यू 6182) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात खेड घाटातील वळणावर झालेल्या अपघातामुळे अरुंद घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूकडून वाहतूक कोंडी झाल्याने अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दोन्ही बाजूकडून सुमारे पाच ते सहा किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

महामार्ग पोलीस, राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस होमगार्ड यांनी कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले. दुपारनंतर कोंडी सुटली. खेड घाटात वाहतूक कोंडी झाल्याने पुण्याला, राजगुरुनगर व मंचरला येथे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. चाकण एमआयडीसी पुणे येथे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना उशीर झाला. दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर खेड घाट आणि राजगुरुनगर शहर हे राज्यातील महामार्गांपैकी एक वाहतूक कोंडीचे ठिकाण बनले आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत असताना पर्यायी व्यवस्था प्रशासन आणि पुढारी करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)