पुणे-नाशिक महामार्गावर शुकशुकाट

राजगुरूनगर – सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला राजगुरूनगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तर पुणे-नाशिक महामार्गावर शुकशुकाट होता. दरम्यान, खेड तालुका सकल मराठा समजाच्या वतीने आज राजगुरुनगर येथील खेड तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्यांसह मराठा समाजाच्या कर्यकर्त्यांनी आरक्षणाबाबात आपली धोरणे स्पष्ट केली. तर मागच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर यावेळी मात्र मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन केले.
या आंदोलनाला सकल मराठा समन्वय समितीचे अंकुश राक्षे, वामन बाजारे, शंकर राक्षे, माणिक होरे, सुरेश गोरे, दिलीप मोहिते पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी धरणे आंदोलनात भजन करून सरकारचा निषेध करण्यात आले. तहसीलदार अर्चना यादव यांना मागण्याचे निवेदन खेड तालुका सकल मराठा मोर्च्याच्या समन्वयकांच्या हस्ते देण्यात आले. दिलीप मोहिते म्हणाले कि, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.या मुद्‌द्‌यावर आम्ही ठाम आहोत. तडजोडी फार झाल्या आता मराठा समाज हटणार नाही. सुरेश गोरे म्हणाले की, ज्या समाजाने इतर समाजाला सांभाळले. त्यांच्यावरच आरक्षणाची वेळ का आली याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

  • तरुणांची आंदोलनाकडे पाठ
    राजगुरुनगर शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत शांततेत बंद पाळण्यात आला. भजन आणि सकल मराठा बांधवांची मनोगते धरणे आंदोलनात झाली. एकमेकांनी आंदोलनाला हिंसक घटना घडू नये यासाठी सर्वांना आवाहन केले होते. सुरक्षिततेसाठी व आंदोलकांनी कोणताही गैरप्रकार करू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर दि 30 जुलै रोजीच्या हिंसक आंदोलनामुळे आजच्या आंदोलनाकडे तरुणांनी पाठ फिरवली. यामुळे पोलीसनावर त्याचा ताण आला नाही
  • आंदोलक रस्त्यावर नसतानाही उत्स्फूर्त बंद
    शहरात आज 100 टक्के बंद पाळण्यात आला. शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. याबरोबरच राजगुरुनगर एसटी बस आगाराने खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बस सेवा बंद ठेवली. शहरातील व्यापारी, छोटे दुकानदार, हॉटेल्स व्यवसायिक, सोने-चांदीची दुकाने, आदी दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संप दुपारपर्यंत सुरू होता, त्यामुळे सरकारी कार्यालयातही शुकशुकाट होता. पुणे-नाशिक महामार्गावर आज कमालीची शांतता होती जड अवजड वाहनांबरोबर ट्रक टेम्पो, चारचाकी वाहने पूर्णतः बंद असल्याने महामार्गावत कमालीची शांतता पसरली होती.सकाळीपासूनच महामार्गावर शुकशुकाट पसरला होता. आंदोलक रस्त्यावर आले नसतानाही सर्वांनी उत्स्फुर्त बंद पाळला. राजगुरूनगर शहरातील अत्यावश्‍यक सेवेत दवाखाने आणि मेडिकल दुकाने उघडली होती यामुळे रुग्णांना मदत झाली. शहरात आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)