पुणे-नाशिक महामार्गावर कोंडी

मंचर- पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीतील पुलावर राख घेवुन निघालेल्या टकचे स्टेअरिंग फेल होऊन तो मध्येच बंद पडला. त्यामुळे सहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती तर तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याने प्रावशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, हा ट्रक बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलीस व महामार्ग पोलीस उशीरा आल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्‍त केली.
भोरवाडी ते कळंब यादरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते. कळंब गावाजवळून गेलेल्या घोडनदीवर अरुंद पूल आहे. या पुलावरुन दोन वाहने कशीबशी पास होतात. आज पहाटे साडेचार वाजता नाशिक-एकलहरे येथून राख घेऊन निघालेला टक (एमएच 04 डि. के. 293) निघाला होता. कळंब येथील पुलावर आल्यावर स्टेरिंग फेल होऊन हा अवजड टक पुलाच्या मधोमध बंद पडला. त्यानंतर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. सुरुवातीला कशीबशी एकेरी वाहतूक सुरू राहिली. मात्र अवजड वाहनांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मंचर व नारायणगावच्या दिशेने तीन ते चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. सकाळच्या वेळी उन्हाचा कडाका होता . त्यामुळे प्रवासी हतबल झाले होते. अनेक वाहनचालकांनी ढाबा अथवा सावलीचा आश्रय घेऊन तेथे वाहने उभी करुन ते रस्ता सुरू होण्याची वाट पाहू लागले. काही वाहनचालकांनी चांडोली मार्गे वळवली. मात्र नवीन वाहनचालकांना हा रस्ता माहीत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.दरम्यापन, बोलवण्यात अलेल्या क्रेनही वाहतूककोंडीत अडकल्याने त्याला पुलावर येण्यास उशीर झाला. सकाळी साडेदहा वाजता वाहतूक पोलीस एस. बी. गिलबिले, अभिषेक कवडे, स्थानिक ग्रामस्थ ज्ञानेश्‍वर सोनवणे, संतोष गुळवे आदींनी क्रेनच्या साह्याने ट्रक पुलावरून बाजुला घेत रस्त्यालगत उभा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास एक तास लागला.

  • ट्रकचालक गेला पळून
    कळंब येथील पुलावर ट्रक बंद पडल्यावर टकचालक पळून गेला. तर क्‍लिनर चक्क ट्रकमध्ये झोपला होता. महामार्ग पोलीस केंद्र पेठ-अवसरी घाटात असूनही ते उशीरा आल्याने वाहनचालक व प्रवाशांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)