पुणे-नाशिक महामार्गावरून ओव्हरलोड ऊस वाहतूक

अपघाताचा धोका वाढला : ट्रॉली उलटण्याच्या घटनांमध्ये वाढ

चिंबळी- पुणे-नाशिक महामार्गावर धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक सुरू असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ट्रॅक्‍टरला दोन-तीन ट्रॉली लावून ओव्हरलोड ऊस वाहतूक होत असून असे ट्रॅक्‍टर उलटत असल्याने रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.
चिंबळी फाटा येथे मागील आडवड्यातच उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टरची ट्रॉली उलटल्यामुळे दोन ते तीन तास वाहतूककोंडी झाली होते. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही;परंतु अपघाताची शक्‍यता नाकारता येत नसल्याने या वाहतुकीला ठराविक वेळ दिला जावा. साधारणत: रात्री उशिराची वेळ दिल्यास वाहतूककोंडी व अपघात होणार नाहीत अशी सूचना वाहनचालकांकडून होत आहे. मोशी पंचक्रोशीतील डुडुळगाव, मरकळ, सोळू, चऱ्होली,कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, चाकण, राजगुरूनगर, शेलपिंपळगाव परिसर आदी भागातून मोशी मार्गे महामार्गावरून ऊस वाहतूक होत असते. यामुळे अवजड वाहतूक असल्याने ट्रॅक्‍टरचा वेग मर्यादित असतो तर महामार्गावरील इतर वाहने भरधाव असतात यामुळे कधीकधी वाहनाला रात्रीच्या वेळी ट्रॅक्‍टरचा वेगाचा अंदाज न आल्याने अपघात होतो तर दिवसा दुचाकीस्वार रस्त्यावर असल्याने वेगात कट मारताना ट्रॉलीला धक्का लागून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळेच प्रशासनाने याकडे लक्ष देत ही वाहतुकीस रात्री उशिराची परवानगी द्यावी दिवसा वाहतूक फेऱ्या कमी कराव्यात अशी मागणी वाहन चालक, प्रवासी करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)