पुणे-नाशिक देशातील पहिली ‘हायस्पीड’ रेल्वे

साडेसात हजार कोटी खर्च अपेक्षित : 220 कि.मी. प्रतितास वेग


दोन तासांत होणार पुणे-नाशिक प्रवास

पुणे – अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला गती मिळाली असून 231 किलोमीटरचा रेल्वेमार्ग निश्‍चित करण्यात आला आहे. यातील 180 कि.मी चे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून उर्वरीत 51 कि.मी चे सर्व्हेक्षण महिनाभरात पूर्ण होईल. यानंतर रेल्वेबोर्डासमोर हा आराखडा मांडला जाणार असून फेब्रुवारी 2019 मध्ये निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष भूसंपादनाचे काम सुरू होईल. ही रेल्वे देशातील पहिलीच हायस्पीड रेल्वे असेल, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

231.761 किमी
एकूण मार्गाची लांबी


180 कि.मी.
ड्रोन सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण


51 कि.मी.
ड्रोन सर्व्हेक्षणाचे काम बाकी


21 कि.मी.
एकूण 12 बोगदे


15 पूल
नदीमार्गावर


1,300 हेक्‍टर जमीन
पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील


21 ठिकाणी
रस्ते क्रॉसिंग होणार


11 ठिकाणी
कॅनॉल क्रॉसिंग बांधणार

केंद्र सरकारच्या 2016च्या रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भारतीय रेल्वेने प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम केले. मात्र, अभियांत्रिकी सर्व्हे सुरू असतानाच हा प्रकल्प नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (महारेल) हस्तांतरित करण्यात आला. महारेलने पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची नव्याने आखणी सुरू केली आहे. त्यानुसार आधीच्या मार्गात बदल करून नवीन मार्गाचे सर्वेक्षण देखील सुरू केले. या प्रकल्पाच्या दुहेरी ट्रॅकसाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार, असून त्यापैकी 1500 कोटी निधी राज्य आणि केंद्र मिळून उभारणार आहेत. तर उर्वरीत 4,500 कोटी रुपये वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांकडून कर्ज स्वरुपात उभे करण्यात येतील, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे बोर्डाच्या पिंक बुकमध्ये राज्यातील तीन मार्गांचा समावेश करण्यात आला असून यात पुणे-नाशिक मार्गाचा समावेश आहे. यामुळे प्राधान्याने हे काम पूर्ण करावे लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

औद्योगिक, शेतीमाल वाहतुकीस चालना
या मार्गाने पुणे-नाशिक हा प्रवास केवळ दोन तासांत पार करता येईल, असा दावा आढळराव पाटील यांनी केला. यामुळे पुणे ते नाशिक या मार्गावरील प्रवासी, औद्योगिक आणि शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळून खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.

…असा असणार मार्ग
पुणे-हडपसर-कोलवडी-वाघोली-आळंदी-चाकण-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-बोटा-जांबूत-साकूर-अंबोरे-संगमनेर- देवठाण-दोडी-सिन्नर-मुढारी आणि नाशिक रोड असा नवीन रेल्वेमार्ग निश्‍चित करण्यात आला.

7 रेल्वे उड्डाणपूल
150 छोटे पूल
31 दरीपूल
18 ठिकाणी मोठे भुयारी मार्ग
99 छोटे भुयारी मार्ग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)