पुणे : नाव समितीतील सदस्यांची मुदत वर्षभर

प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर


यापूर्वी होती 5 वर्षे तरतूद

पुणे- अन्य विशेष समित्यांप्रमाणे नाव समितीतील सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांऐवजी एक वर्षांचीच असावी, या प्रस्तावाला महापालिका मुख्यसभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली.
महापालिकेत विधि, शहर सुधारणा, महिला-बालकल्याण आणि क्रीडा समिती या एकूण चार विशेष समित्या आहेत. याशिवाय नाव समिती ही एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, या समितीची नेमणूक महापालिका अधिनियमाच्या कलम 31 अन्वये पाच वर्षांसाठी असते आणि अन्य समित्यांची नेमणूक एक वर्षांसाठी असते. एक वर्षानंतर या समितीवरील सदस्य बदलतात.

इतर समित्यांवरील सदस्य बदलत असल्याने सर्व नगरसेवकांना त्यामध्ये संधी मिळते. त्यामुळे नाव समितीची मुदतही एक वर्षेच ठेवावी, असा प्रस्ताव सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला महापालिका मुख्यसभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवी समिती नियुक्त करून आधीची समिती बरखास्त करावी, असे देखील या प्रस्तावात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)