पुणे: नाणार, कोणत्याही परिस्थितीत नाही होणार!

उद्योगमंत्री सुभाष देसाई : अधिसूचना रद्द करण्याची केली शिफारस
– संयमी आंदोलनाची गांभिर्य लक्षात घेण्याचा सल्ला
– केंद्र सरकारने परस्पर निर्णय घेतल्याचा दावा

पुणे – कोकणातील नाणार येथे ऑइल रिफायनरी उद्योग आणण्यासाठी केंद्र सरकार परदेशी कंपन्यांबरोबर करार करत आहेत. मात्र, या प्रकल्पाला नाणार ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हा करार केवळ कागदावरच राहणार आहे. प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला, तर त्या गावातील जनता कशी ठोकून काढते हे कळेल. त्यामुळे केंद्र सरकारने येथे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. दरम्यान, त्याबाबत काढलेली सही करण्यात आल्याची माहिती देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणार येथे उद्योग आणण्यासाठी केंद्र सरकारने मागील महिन्यात सौदी अरेबिया येथील कंपनीबरोबर करार केला. त्यानंतर अबुधाबीमधील कंपनीबरोबर करार केले. हे दोन्ही करार दिल्लीमध्ये परस्पर झाले असून, त्याला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांना बोलावले नाही. तसेच या कराराबाबत माझ्यासह मुख्यमंत्र्यांनाही कल्पना नसल्याचे देसाई यांनी सांगितले. एखादा उद्योग महाराष्ट्रात आणायचा असेल, तर केंद्र सरकारने राज्याच्या उद्योग विभागाला आणि शासनाला बरोबर घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता परस्पर करार करून उद्योग आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, हा प्रयत्न केवळ कागदावरच राहणार हे नक्की.

कारण, नाणार येथील सर्व ग्रामपंचायतींनी “आम्हाला प्रकल्प नको’ असा एकमताने ठराव केला आहे. तेथील जमीन मोजनीलाही तीव्र विरोध केला आहे. असे असताना केंद्र सरकारला केवळ करार करण्यात रस आहे. दरम्यान, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. ज्यावेळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी गावामध्ये उद्योग प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी जनतेने तीव्र आंदोलन केले. त्या आंदोलकांवर गोळीबार झाला आणि 14 जणांना जीव गमवावा लागाला. त्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. परंतू 14 जणांचा जीव गेला. त्यामुळे असे अनुचित प्रकार महाराष्ट्रात होऊ नये, नाणारची लोक संयमपूर्वक आंदोलन करत आहे. त्याची दखल घ्यावी. त्याला वेगळे वळण लागू नये असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यावर जनतेला प्रकल्प नको असेल तर तो लादणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

चर्चा करायची असेल, तर जनतेशी करा
नाणार प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याबाबत सूचविले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत चर्चेस नकार देत, “केंद्र सरकारला चर्चाच करायची असेल तर नाणारच्या जनतेशी करा, आम्ही जनतेच्या पाठीशी राहणार’ असे ठरविले आहे. त्यामुळे “आमच्याशी चर्चा करू नका’ असे सांगितले. दरम्यान, सरकारला हा प्रकल्प लादायचा असेल, तर आमचे त्यांना आमंत्रण आहे, असे व्यक्तव्य सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)