पुणे – नव्या तंत्रज्ञानाचे अभियांत्रिकी शिक्षणासमोर आव्हान

पुणे – लष्करी तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था या लष्करी अधिकारी, जवान यांच्या मुलांना तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण देणाऱ्या देशातील एकमेव लष्करी संस्थेत लवकरच कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील एमई अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. संगणक अभियांत्रिकी अधिक विस्तृत ज्ञान देण्याबरोबरच इतर अभियांत्रिकी शाखेतील अभ्यासक्रमांचादेखील थोडा भाग या अभ्यासक्रमात सामाविष्ट असणार आहे.

लष्करी तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एआयटी) या केवळ सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या या संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकीच्या ज्ञानासोबतच लष्करातील शिस्त आणि समर्पकवृत्ती असे दोन्ही गुण आढळतात. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. अद्ययावात शिक्षण पद्धतीमुळे येथे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्यादेखील जास्त आहे. त्याच अनुषंगाने आगामी काळात संस्थेत काही अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्यासोबतच, नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये इलेक्‍ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या जागा 60 वरून 120 पर्यंत वाढविणे, इलेक्‍ट्रीकल, सिविल अभियांत्रिकी तसेच बाजारपेठेतील आवश्‍यक कौशल्यावर आधारित पदवी अभ्यासक्रम अशा अभ्यासक्रमांसोबतच विविध अभियांत्रिकी शाखा तसेच संगणक अभियांत्रिकीमधील सखोल, अद्ययावत शिक्षण देणारा “कम्प्युटर इंजिनीअरिंगमधील एमई’ अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत संस्थेचे संचालक ब्रिगेडियर अभय भट (नि,) म्हणाले, “सध्याच्या युगात केवळ एका अभियांत्रिकी शाखेचा अभ्यास पुरेसा ठरत नाही. त्यामुळेच आंतरशाखीय (इंटरडिसिप्लिन) अभ्यासक्रमांचा समावेश असलेला हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय संस्थेकडून घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव संस्थेच्या नियामक मंडळाकडे पाठविण्यात आला असून, त्यासाठी निधीची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर 2020 पर्यंत हा अभ्यासक्रम सुरू होण्याची आम्हाला अपेक्षा आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)