पुणे: नदी सुधार योजनेच्या निविदांचा मार्ग मोकळा

कर्ज पुरवठादार कंपनीची निविदा प्रक्रीयेला मान्यता : नायडूसह सहा प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश

पुणे – प्रदूषणाच्या विळख्यामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या नद्यांना संजिवणी देण्यासाठी महापालिकेकडून जपानच्या जायका कंपनीच्या सहकार्याने नदी सुधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नायडू मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पासह सहा प्रक्रिया प्रकल्पांच्या निविदा प्रक्रीया राबविण्याच्या कामाला जायका कंपनीने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सहा निविदा प्रक्रीया येत्या 15 जूनपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी दिली.

मुळा-मुठा नदी सुधार योजनेसाठी पुणे महापालिकेला केंद्र शासनाकडून 900 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. यासाठी जपानच्या जायका कंपनीने अल्पदरात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या प्रकल्पांतर्गत शहराच्या विविध भागांतून गोळा होणारे मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 11 ठिकाणी सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून, काही ठिकाणी ड्रेनेज लाईनचीही कामे सुरू केली जाणार आहेत. साधारण दीड वर्षापूर्वी या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर सल्लागार नेमणे व अन्य तांत्रिक बाबी पार पाडण्यासाठी बराच कालावधी गेला आहे. मैलापाणी प्रक्रिया केंद्र जायका कंपनीच्या देखरेखीखालीच बांधण्यात येणार असून पुणे महापालिकेने 11 प्रक्रिया प्रकल्पांचे प्रस्ताव जायका कंपनीकडे पाठविले होते. त्यापैकी 127 एमएलडी क्षमतेच्या सर्वात मोठ्या नायडू प्रक्रिया प्रकल्पासह अन्य पाच प्रकल्पांना शुक्रवारी जायका कंपनीने मान्यता दिली असून त्याचे पत्र महापालिकेस पाठविण्यात आले आहे.

15 जूनपर्यंत “त्या’ चार प्रकल्पांची निविदा
महापालिकेने नदी सुधार योजनेंतर्गत होणाऱ्या प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांसाठी जायका कंपनीची ना हरकत घेणे गरजेचे आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये जायकाकडे 11 प्रक्रिया प्रकल्पांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी नायडू, भैरोबा नाला, कल्याणीनगर, मत्स्यबीज केंद्र मुंढवा, न.ता.वाडी, धानोरी प्रकल्पाला शुक्रवारी जायका कंपनीने मान्यता दिली. उर्वरीत तीन प्रकल्पांसाठीच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटीही पूर्ण केल्या असून येत्या आठवड्याभरात त्या प्रक्रल्पांच्या कामानांही मान्यता मिळेल. यामध्ये भैरोबानाला आणि कल्याणीनगर येथील प्रकल्पाचाही समावेश आहे. जायकाकडून नाहरकत मिळाल्यानंतर येत्या 15 जूनपर्यंत चारही प्रकल्पांची निविदा काढण्यात येईल, असे माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)