पुणे-नगर रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

वाहतूक पोलीस नव्हते जाग्यावर ः रुग्णवाहिका दोन तास अडकून पडली
 
वडगावशेरी – सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्यामुळे पुणे-नगर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी सलग दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. नगर रस्त्यावरील म्हणजेच इनॉर्बीट मॉल ते खराडी बायपास या ठिकाणापर्यंत गाड्यांच्या दूरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या.

सलग दोन तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे या रस्त्यावर रुग्णवाहिकेला मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तसेच गर्दीतून मार्ग काढताना वाहतूक चालकांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या रस्त्यावर वाहतुकीच्या बाबतीत नेहमीचीच कोंडी होत असते. त्यातच मेट्रोच्या कामामुळे आणखीच गर्दीची भर पडली आहे. नंतर मात्र, पोलीस येऊन रस्ता मोकळा केला. इतरवेळी चौका-चौकांत एकाच जागी 3 ते 4 वाहतूक पोलीस थांबलेले चित्र असते. मात्र जेव्हा वाहतूक कोंडी होते तेव्हा हे पोलीस कुठे असतात, त्याचा कोणालाच पत्ता नसतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक नियंत्रण करण्याचे काम मात्र सर्वसामान्य नागरिक करताना दिसून येते होते. वाहतूक कोंडीत या ठिकाणी असलेले अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावरील विक्रेते देखील जबाबदार असतात. कारण, त्यामुळे रस्ते आखूड पडतात आणि वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते.

सध्या हेल्मेट सक्तीची कारवाई जोरदार सुरू असल्यामुळे कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस कंबर कसून काम करताना दिसतात. मात्र, वाहतूक कोंडी नाहीशी करण्यासाठी कंबर कसून काम करताना दिसून येत नाहीत. संदर्भात नागरिकांना विचारल्यास ते म्हणाले की, रुग्णवाहिका जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यापेक्षा दुदैव ते काय… मात्र, जागेवर वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस असते तर कदाचित रुग्णवाहिका वेळेवर पोहचली असती. संबंधित वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.

वडगाव शेरी : पुणे-नगर रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)