पुणे-नगर रस्त्यावर दुतर्फा “नो पार्किंग’

पुणे – शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध प्रकारचे बदल करण्यात येत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर पुणे-नगर रस्त्यावर खराडी दर्गा चौक ते टाटा गार्डरूम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस “नो पार्किंग’ करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन, वन वे मार्ग, नो एंट्री आदी स्वरुपाचे बदल करण्यात येत आहेत. विशेषतः ज्या भागात सातत्याने कोंडी होते अशाठिकाणी वाहतुकीचे कडक निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच, नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी महापालिका कायद्याचा आधार घेतला जात असून जादा दंड आकारला जात आहे.

-Ads-

जड वाहनांना बंदी
विमानतळ वाहतूक विभागांतर्गत खराडी चौक ते मुंढवा ब्रिज या खराडी-हडपसर बायपास मार्गावर सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 9 दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचेही वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. या दरम्यान, फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी वाहनांना नियमातून वगळण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)