पुणे-नगर रस्त्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय

  • टॅंकरव्दारे होतोप पाणीपुरवठा : तालुक्‍यातील काही भागात पाणी पातळी खालावली

शिक्रापूर, दि.31 (वार्ताहर) – सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली असून कित्येक ठिकाणी विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. तसेच कित्येक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आणि दुष्काळाचे सावट जाणवत असताना पुणे-नगर रस्त्यावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कोंढापुरी (ता. शिरुर) सह परिसरात औद्योगिक वसाहतीमुळे कंपनी आणि व्यवसायिकांचे एक मोठे जाळे तयार झाले आहे. येथील औद्योगिक वसाहतींमुळे अनेकांनी त्यांच्या ट्रक, टेम्पोमध्ये बदल करुन त्या वाहनांचे टॅंकर बनविले आहेत. या वाहनाद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. अशाच प्रकारे (एमएच 14 व्हि 4293) टॅंकरमधून पाणी विक्री होत असताना चालकाकडून मात्र पाण्याची बेफिकीरपणे वाहतूक करत आहेत. अनेक ठिकाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट असताना कित्येक झाडे आणि शेती पाण्यावाचून जळून जात आहे. काही ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरत असताना महामार्गावर इतक्‍या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. वाहनांमध्ये बदल करण्यासाठी राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळ विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील टेम्पो, ट्रकचे वाहनचालक, मालक वाहनांमध्ये बदल करुन टॅंकर तयार करुन त्याद्वारे पाणी विक्री करत आहेत. मात्र, बेजबाबदारपणे पाणी वाहतूक करत असाताना रस्त्यावर शेकडो लिटर पाणी वाया घालवून वाहतूक करीत आहेत. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची आवश्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)