पुणे-नगर रस्त्यावर अपघातात वृद्धाचा मृत्यू

तळेगाव ढमढेरे-पुणे नगर रस्त्यावर तळेगाव ढमढेरे गावच्या हद्दीत चोवीसवा मैल येथे दुचाकीला पाठीमागून कारने जोरात ठोकरल्याने एका ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी झाली असल्याची घटना घडली आहे.
दशरथ बाबुराव धायरकर (रा. चोवीसवा मैल तळेगाव ढमढेरे) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या लक्ष्मीबाई बबन गायकवाड (रा. काळूस, माळवाडी, ता. खेड) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी सुनील बाबुराव बाजारे (रा. बुर्केगाव, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नगर रस्त्यावरून दशरथ बाबुराव धायरकर हे त्यांचे नातेवाईक लक्ष्मीबाई बबन गायकवाड यांना शिक्रापूर चौकातून घेऊन त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच 12 एवाय 9872) घरी चाललेले असताना पाठीमागून भरदाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने (एमएच 12 एनयू 1992) जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण खाली पडले. त्यावेळी याबाबत निलेश सुरेश धायरकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कार चालक सुनील बाजारे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)