पुणे : धरणात बुडालेल्या चेन्नईच्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले

पुणे: धरणात बुडालेल्या चेन्नईच्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.  समरकॅम्पसाठी ही मुलं पुण्यात आली होती. मुळशीमधील कातरखडक गावाजवळ धरणात तीन विद्यार्थी बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह काल तर उर्वरित दोघांचे मृतदेह आज सापडले.

दानिश राजा, संतोष के आणि सर्वन्ना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. ते तिघेही १३ वर्षांचे होते. चेन्नईहून ईसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेतून २० विद्यार्थ्यांचा ग्रुप मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये एक आठवड्याच्या समर कॅम्पसाठी आला होता. त्यांच्यासोबत एक पुरुष, तर तीन महिला शिक्षक होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)