पुणे – द्राक्षांना पररज्यातून मागणी

थंडी कमी झाल्याने गोडी वाढली


दररोज होतेय 60 ते 65 टन आवक


दर्जानुसार 50 ते 100 रुपये किलो भाव

पुणे – थंडीचा कडाका कमी होताच द्राक्षांतील गोडी वाढली आहे. त्यामुळे द्राक्षांना राज्याच्या विविध भागांसह केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि गुजरात येथून मागणी वाढली आहे. सध्या मार्केट यार्डातील फळविभागात दररोज सुमारे 60 ते 65 टनांची आवक होत आहे. पांढऱ्या द्राक्षाला 15 किलोला 350 ते 1000, तर काळ्या द्राक्षाला 10 किलोला 350 ते 850 रुपये भाव मिळत आहे.

येथील बाजारात जिल्ह्यासह सांगली, सातारा, नाशिक, निफाड आणि सोलापूर भागांतून आवक होत आहे. पांढऱ्या द्राक्षात हलक्‍या माल अधिक आहे. तर काळ्या द्राक्षांत चांगल्या प्रतिचा जास्त आहे. द्राक्षांची आवक दिवसेंदिवस वाढत जाईल. येत्या काळात घाऊक बाजारातील द्राक्षांची आवक 100 टनांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सद्य:स्थितीत बाजारात थॉमसन, माणिकचमण, सोनाका, सुपर सोनाका, जम्बो, कृष्णा, सरीता, शरद आदी प्रकारच्या द्राक्षांची आवक होत आहे. आवक वाढल्यानंतर भावात आणखी घट होण्याची शक्‍यता आहे. किरकोळ बाजारात किलोचा भाव दर्जानुसार 50 ते 100 रुपये किलो आहे.

एप्रिलपर्यंत असणार आवक
डिसेंबर महिन्यापासून द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. ही आवक एप्रिलपर्यंत असणार आहे. मागील वर्षी द्राक्षाला पोषक हवामान नव्हते. त्यामुळे उत्पादन कमी होते. त्यामुळे हलक्‍या प्रतिच्या मालालाही भाव मिळला होता. यंदा मात्र चांगल्या प्रतिच्या मालाचे दरही आवक वाढल्याने आवाक्‍यात आले आहेत. यंदा बागेतून खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)