पुणे-दौंड डेमूत रंगतोय तीन पत्त्यांचा डाव

यवत-बहुप्रतिक्षीत आणि सर्वात चर्चिली गेलेली सर्वांच्या जीवा भावाची लोकल सेवा नुकतीच सुरू होऊन मोठ्या थाटामाटात पुणे-दौंड अशी डेमू प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. याच डेमूमधुन दररोज प्रवास करणारे उच्च नोकरदार वर्ग गर्दीतील प्रवाशांची तमा न बाळगता डेमूमधील मोकळ्या जागेत अड्डा मांडत पैशावर तीन पत्त्यांचा खेळ खेळत मग्न असतात. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून या प्रकाराकडे मात्र रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
याच डेमूने बारामती व दौंड परिसरातील रोज हजारो नोकरदार, चाकरमाने, विद्यार्थी – विद्यार्थिनी, दूध व्यवसायिक व शेतकरी वर्ग पुणे शहरात जाण्यासाठी प्रवास करीत असतात. सकाळी लवकर पुणे शहराकडे जाण्यासाठी डेमूमध्ये प्रवाशांची मोठी मोठभ गर्दी पहावयास मिळत आहे. गर्दीमुळे प्रवाशांना तर दाटीवाटीने डेमूमध्ये उभे राहून प्रवास करावा लागत आहे. कडेठाण, खुटबाव, मांजरी या स्थानकांच्या फलाटांच्या उंचीची कामे अपूर्ण असल्याच्या तांत्रिक कारणामुळे विद्युत लोकल अद्याप सुरू होऊ शकली नाही. सध्या डिझेलवर सुरू असलेल्या डेमूचे वेळापत्रक अनिश्‍चित असल्याने दौंडकरांचे विद्युत लोकलचे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. सध्या सुरु असलेल्या या डेमूमध्ये सकाळी प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे. याच गर्दीत खुलेआम पत्या खेळणाऱ्यांचा रेल्वे विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)