पुणे: दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे – शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यातील एका मृताची ओळख पटू शकली नाही.
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे एका पीकअपने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या ज्येष्ठ नागरिकाची ओळख अद्याप पटू शकली नाही. टिळक रस्त्यावर नानुमल हॉटेल जवळ ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात पीकअप चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका घटनेत राजेंद्र पांडुरंग पन्हाळे (40, रा. टिंगरेनगर, धानोरी रोड) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या अपघातात त्याचा मित्र नामदेव पवार हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री संगमवाडी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पन्हाळे हा मित्र पवार याला दुचाकीवर मागे बसवून भरधाव वेगात चालला होता. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी समोरील कारला जोरात धडकली. याघटनेत गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)