पुणे – दोन नव्या मार्गांवर पीएमपीची रातराणी

पुणे – शहरात रात्री 12 वाजेनंतर धावणाऱ्या रातराणी बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून उत्पन्नही चांगले आहे. सद्यस्थितीत सहा मार्गांवर रातराणी सेवा सुरू आहे. यात आणखी नव्या दोन मार्गांची वाढ करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सद्यस्थितीत शहरातील सहा प्रमुख मार्गांवर रातराणी बससेवा सुरू आहे. रात्री बारानंतर दर तासाला ही बससेवा उपलब्ध आहे. त्यासाठी नेहमीच्या तिकिटापेक्षा 5 रुपये जादा शुल्क आकारण्यात येते. शहरात प्रामुख्याने स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथून रातराणी सेवा देण्यात येते. यामुळे राज्यातील विविध भागातून रात्री-अपरात्री उशीरा या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होतो. तसेच, इतर प्रवासी वाहनांकडून आकारण्यात येणारी जादा रकमेची लूट थांबते. याच पार्श्‍वभूमीवर ही सेवा वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

…शहरात सध्या सुरू असलेले रातराणी मार्ग
– कात्रज ते शिवाजीनगर
– पुणे स्टेशन ते कात्रज
– हडपसर ते स्वारगेट
– पुणे स्टेशन ते हडपसर
– पुणे स्टेशन ते कोंढवा गेट
– पुणे स्टेशन ते वाघोली

नव्याने सुरू करण्यात येणारे मार्ग
– स्वारगेट ते पुणे स्टेशन
– स्वारगेट ते शिवाजीनगर

एकूण बसेसची संख्या
एकूण 8 मार्गांसाठी 14 बसेस

शहरात रात्री, मध्यरात्री बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. हे लक्षात घेऊन पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट या स्थानकांपासून प्रवाशांना रातराणीच्या बस उपलब्ध होणार आहेत. यासाठी दोन नवे मार्ग निवडण्यात आले आहेत. दि.30 जानेवारीपासून नव्या मार्गांवर प्रत्यक्षात बसेस धावतील.
– सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)