पुणे: दोन घटनांत दोघे बुडाले

हडपसर-वैदुवाडीतून एकाचा मृतदेह सापडला

पुणे – दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या भागातील दोघांनी कॅनॉलमध्ये उडी मारली. यामध्ये हडपसर-वैदुवाडी परिसरातील कॅनॉलमधून सोमवारी सकाळी अग्निशमन विभागाच्या जवानांनी एकाचा मृतदेह बाहेर काढला, तर दुसरी घटना नांदेडफाटा-कॅनॉल ओव्हरब्रीज याठिकाणी घडली. येथील महिलेने कॅनॉलमध्ये रविवारी मध्यरात्री उडी मारल्याची घटना घडली होती. त्यानुसार अग्निशमन विभागाच्या जवानांनी कॅनॉलमध्ये तब्बल तीन तास शोधमोहीम राबवली मात्र, महिलेचा शोध लागला नाही.

-Ads-

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वैदवाडी – हडपसर परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये पोलिसांना एक मृतदेह आढळून अला. यानंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मात्र, मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. दुसरी घटना नांदेडफाटा-ओव्हरब्रीज येथील कॅनॉलमध्ये घडली. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास या परिसरातून एक महिला घराबाहेर निघून गेली होती. यानंतर घरच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. परंतु त्यांना ती सापडली नाही. मात्र, कॅनॉलशेजारी तिचा मोबाइल सापडला. यामुळे तिने कॅनॉलमध्ये उडी मारल्याचा संशय नातेवाईकांना आला. रात्रभर शोध घेऊन सकाळी सातच्या सुमारास सिंहगड रोड फायर स्टेशन येथे संपर्क साधला. व कर्मचाऱ्यांना घडलेली हकिकत सांगितली. त्यानुसार अग्निशमन विभागाच्या जवानांनी कॅनॉलकडे धाव घेतली. सकाळी 7 ते 11 पर्यंत त्यांनी कॅनॉलमध्ये महिलेचा शोध घेतला मात्र, शोध लागला नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)