पुणे : देवेन शहा खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक

पुणे- बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. दरम्यान, यापूर्वीही अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.

समीर सदावर्ते आणि नितीन दांगड असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी रविंद्र चोरगे व सुरेंद्र पाल यांना अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेन शहा यांची 13 जानेवारी रोजी डेक्कन परिसरात प्रभात रोड येथे हत्या झाली होती. पैशांच्या वादातून हे प्रकरण झाल्याचे तपासात समोर आले होते. डेक्कन पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी या घटनेचा समातंर तपास सुरू केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच चोरघे याला जळगाव येथून अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात गुन्ह्यात वापरलेली पिस्तूले आणि काडतुसे ठाण्यातील पाल याच्या घरी ठेवल्याची कबुली चोरघे याने दिली.

त्यानुसार डेक्कन पोलिसांनी पाल याच्या ठाण्यातील आझादनगर येथे अटक केली. दरम्यान, पोलिसांनी तपास करत गुरुवारी या प्रकरणातील आणखी दोघांना अटक केली. यामुळे दिवसेंदिवस या प्रकरणातील धागेदोरे उलगडत चालले आहेत. पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांच्या पथकाने ही अटक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)