पुणे: “दुपारच्या वेळी “डिस्टर्ब’ करू नका!’

472 कुटुंबे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गात बाधित होणार

80 टक्के मिळकती पुणे महापालिका हद्दीतील

250 कुटुंब- कर्वे रस्त्यावरील बाल तरूण मंडळ (आयडियल कॉलनी) राजीव गांधीनगर, कामगार पुतळा, तोफखाना परिसर.

248 मिळकती- कसबा पेठ. (दुकानांची संख्या 38)

90 मिळकती – मंडई परिसर (दुकानांची संख्या 38)
84 दुकाने – स्वारगेट परिसर

28 दुकाने – कर्वेरस्ता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक

सर्वेक्षण लांबले : मेट्रो बाधितांची “वामकुक्षी’ ठरतेय अडथळा

1 ते 4 वाजेदरम्यान मिळकतधारक भेटत नसल्याचा दावा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पात स्थानके आणि मेट्रो मार्गामुळे 688 कुटुंबे बाधित होत आहेत. त्यात 242 व्यावसायिक, तर इतर सर्व निवासी मिळकती आहेत. या मिळकतधारकांचे सामाजिक, आर्थिक परिणाम निर्धारण सर्वेक्षण खासगी संस्थेच्या माध्यमातून करून घेतल्यानंतर दि. 1 जूनपासून महामेट्रोने स्वत: विस्तारीत सर्वेक्षण केले आहे. मात्र, शहरातील मिळकतबाधित दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान भेटतच नसल्याने गेल्या महिनाभरात महामेट्रोला फक्‍त 396 कुटूंबाचेच सर्वेक्षण करता आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकरांची दुपारची वामकुक्षी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

महामेट्रोने वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गांचे काम हाती घेतले आहे. सुमारे 31 किलोमीटर लांबीच्या दोन्ही मेट्रो मार्गांमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 5 किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांमध्ये येणारी स्थानके आणि मेट्रो मार्गिकेमुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक परिणाम निर्धारण सर्वेक्षण सेंटर फॉर मार्केट रिसर्च या संस्थेकडून करून घेतले होते. या संस्थेने या बाधित कुटुंबीयांना भेट देऊन त्यांच्याकडून आवश्‍यक माहिती सर्वेक्षणातून जमा केली आहे. त्याचा अंतिम अहवाल महामेट्रोला सादर केला.

याचा आधार घेऊन महामेट्रोकडून 1 जून 2018 पासून या बाधितांचा अंतिम सर्वे सुरू करण्यात आला. हा सर्वे महिनाभरात पूर्ण केला जाणार होता. मात्र, दुपारच्या वेळेत पुणेकर भेटच देत नसल्याने तसेच अनेक व्यावसायिक दुकानेही दुपारी बंद राहत असल्याने हे सर्वेक्षण मागे पडल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आणि कर्वे रस्त्यावरील बाधित मिळकतींचे सर्वेक्षण झाले असून मध्यवस्तीतील निवासी मिळकती आणि व्यावसायिक मिळकतींमध्ये सर्वेक्षणासाठी 1 ते 4 जाता येत नसल्याने हे सर्वेक्षण मागे पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)