पुणे – दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटणाऱ्यास पोलीस कोठडी

पुणे – दुचाकीस्वाराला अडवत डोक्‍यात फरशी घालून रोख रक्‍कम लुटणाऱ्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. शेजवळ यांनी 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.

सनी अरुण बागव (23, रा. महात्मा फुले स्मारकाजवळ, गंजपेठ) असे कोठडी सुनावल्याचे नाव आहे. या प्रकरणी इस्माईल बाशु सय्यद (42, रा. दत्तनगर, कात्रज) यांनी 26 डिसेंबर 2017 रोजी फिर्याद दिली होती. या घटनेत अनिकेत अमर ढगे (19, रा. गोकुळनगर, कात्रज) याला यापूर्वी अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबरच्या मध्यरात्री फिर्यादी हे आपल्या दुचाकीवरून गंगाधाम अप्पर रोडने कात्रजकडे जात होते. यावेळी आरोपी आपल्या साथीदारासोबत फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांना अडविले. यानंतर फिर्यादी यांच्या डोक्‍यात फरशी घालून त्याला गंभीर जखमी केले. तसेच, त्यांच्याजवळील 7 हजार 200 रुपये लुटून नेले होते. यापैकी बाराशे रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दरम्यान, अटक आरोपीकडून उर्वरीत रक्‍कम हस्तगत करायची आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करून ब्लड सॅंपल काढूण घेणे आहे. त्याचबरोबर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास करायचा असल्याने आरोपीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अनंत चौधरी यांनी केली होती. न्यायालयाने ती मंजूर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)