पुणे : दागिने घडविण्यासाठी घेतलेल्या 1 कोटी 21 लाखाला गंडा

पुणे – दागिने घडविण्यासाठी घेतलेले 1 कोटी 20 लाखाचे सोने व 1 लाख 46 हजाराची रोकड घेऊन एकाने पळ काढला. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी स्वप्निल कोठारी (42, रा. वेलनकरनगर, पर्वती) यांचा सोन्याचे दागिने घडवून देण्याचा व्यवसाय आहे. ते मुंबई येथून हे दागिने एकाकडून तयार करून घेतात. त्यांनी नेहमीच्या विश्‍वासातल्या संबंधीत व्यक्तीला एका ज्वेलर्सकडून दागिने घडविण्यासाठी मिळालेली सोन्याची लगड व सोन्याचे तुकडे असे 1 कोटी 20 लाखाचे सोने व 1 लाख 46 हजार रुपयांची रोकड असा 1 कोटी 21 लाख 46 हजार 200 रुपयांचा ऐवज 1 एप्रिल रोजी दिला होता. आरोपी हा ऐवज घेऊन मुंबई येथे दागिने बनविण्यासाठी गेला. मात्र त्याने दागिने बनवून न देता फिर्यादीबरोबरचा संपर्क टाळला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डफळ तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)