पुणे : दरोड्याच्या तयारीतील चौदा जणांना अटक

पुणे – दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चौदा जणांच्या टोळीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून घरफोडीचे साहित्य, चाकू, मिरची आणि खुजली पावडर हस्तगत करण्यात आली. हे चौदाही जण मूळचे आंध्रप्रदेशचे रहिवाशी असून मागील दीड महिन्यापासून मांजरी परिसरात राहतात.

चिन्ना बाबु कुनचाल्ला (29), सॅम्युल राज तिमोती राज (25), विजयकुमार शेखर रेड्डी (26), चल्ला सनी येलीया सल्ला (26), राजेश जेमीस गोगुल (23), संतोष देवरकोंडा रामलुर (36), राकेश दावित आवला (19), येशेबु जानु गोगला (52), शवकुमार रविबाबु पिटला (36), उतजल सुबलु आवला (40), सुभाष रवि बानाळु (29), आमुस तिपय्या आवला (32), माधव सुंदरम गोगला (37) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे सर्व आरोपी मांजरी परिसरात राहत आहेत. ते मागील दीड महिन्यापासून आंध्रप्रदेशातून पुण्यात राहायला आले आहेत. ते एका ठिकाणी दरोडा टाकायला जाणार असल्याची माहिती मुंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी छापा मारुन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून चाकू, कोयता, मिरची व खुजली पावडर हस्तगत करण्यात आली. ते कोठे दरोडा टाकणार होते याची चौकशी सुरू करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. जी. गवळी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)