पुणे: दरोड्याच्या तयारीतील तीन जणांना अटक

पुणे – बिबवेवाडी परिसरातील स्टेट बॅंक एटीएमजवळ मंगळवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांचे चार साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

त्यांच्याकडून बेकायदेशीर तलवार, लोखंडी कोयता, कटावणी, मिरची पूड अशा घातक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई अमित पुजारी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, नीलेश राजू कुडले (वय 19, रा.पापडवस्ती, बिबवेवाडी), कुणाल उत्तम साठे (19, रा. कुमार पार्क) आणि महेंद्र गंगाराम अहुजा (19, रा. भुराणी कॉलनी, मार्केटयार्ड) या आरोपींना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)