पुणे – दररोज 5 जणांच्या हाती “इंटरनॅशल स्टेअरिंग’

– ऑनलाईन प्रक्रियेमुळे एक दिवसात मिळतो परवाना

पुणे – नोकरी तसेच शिक्षणासाठी परदेशात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज भासते. परिणामी, परवाना काढणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पूर्वी किचकट असेलली ही प्रक्रिया वर्षांपूर्वी ऑनलाईन करण्यात आली. यानुसार दरदिवसाला सरासरी पाच जण “इंटरनॅशल’ परवाना काढत असल्याचे आरटीओच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोकरी, शिक्षणासाठी परदेशात राहणाऱ्यांची संख्या मोठी असून अशा भारतीय नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. यासाठी देशातील ज्या ठिकाणी तो राहायला आहे, तेथील आरटीओकडून त्याला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. 2018 पूर्वी ही प्रक्रिया मॅन्युअली असल्याने त्याला विलंब लागत असे. नागरिकांना परवाना काढणे सोपे जावे यासाठी 2018 पासून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. यानुसार संबंधीत अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरून “सारथी’ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करावा लागतो. याठिकाणी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. या परवान्यासाठी संबंधीत अर्जदाराकडे वाहन परवाना असल्यास पुन्हा वाहन चालवणे तसेच परीक्षा देण्याची गरज लागत नाही. मात्र, त्यांचे सध्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व व्हिसा याची पडताळणी केली जाते. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला मूळ कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष पडताळणीसाठी आरटीओत जावे लागते. यानंतर कागदपत्रांची तपासणी करून आरटीओतून त्याला एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. अशा प्रकारे 2017 या वर्षात 2 हजार 955 नागरिकांनी; तर 2018 साली 1 हजार 776 नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेतला आहे.
——————-
…ऑनलाईनंतर प्रमाण घटले
नागरिकांना आंतरराष्ट्रीय परवाना काढणे सुलभ जावे यासाठी 2018 पासून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. यामुळे नागरिकांना घरबसल्या हे काम करणे शक्‍य होते. मात्र, ऑनलाईन प्रक्रिया होऊन देखील चालु वर्षी (दि. 26 डिसेंबरपर्यंत) केवळ 1 हजार 776 जणांनी आंतरराष्ट्रीय परवाना काढला. मात्र, 2016 साली हेच प्रमाण 3 हजार 441 तर 2017 साली 2 हजार 955 इतकी होती. विशेष म्हणजे या कालावधीत मॅन्युअली प्रक्रिया करावी लागत होती.
—————–
वर्ष – आंतरराष्ट्रीय परवान्यांची संख्या
2016 – 3,441
2017 – 2,955
2018 – 1,776

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)