पुणे: थोड्या पावसाने 16 तास वीज गायब

Electricity

नागरिक संत्पत, विभाग प्रमुखांची त्वरीत बैठक

पुणे- शहर आणि उपनगरात वारंवार होत असलेली बत्ती गुल, सर्वसामान्य ग्राहकांशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटलेला संपर्क आणि महसूल वसूलीचा घसरलेला आलेख यावरून महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी सोमवारी (दि.12) पुणे परिमंडलातील अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. येत्या आठवड्यात या कामांमध्ये सुधारणा करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.

-Ads-

गेल्या काही दिवसांच्या कालावधीत शहरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर महावितरणची यंत्रणा अक्षरश: कोलमडली. अनेक भागांमध्ये पंधरा ते सोळा तास वीज गायब झाली. याठिकाणी वीजपुरवठा करण्यासाठी पर्यायी यंत्रणाही उपलब्ध नसल्याने नागरिकांना अंधारातच राहावे लागले; हे वास्तव असतानाच काही अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य ग्राहकांचे फोनच घेतले नाही. त्यामुळे अनेक नागरिक संतापले होते. त्यामुळे यातील काही नागरिकांनी थेट महावितरणच्या पुणे परिमंडलाचे तत्कालीन मुख्य अभियंता मल्लेशा शिंदे तसेच प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्याशी संपर्क साधून याबाबत गाऱ्हाणे सांगितले होते. त्याची गंभीर दखल घेत ताकसांडे यांनी पुणे परिमंडलातील प्रत्येक कार्यालयातील विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ताकसांडे यांनी जवळपास सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

मान्सूनपूर्व दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, हे वास्तव असतानाही थोडासा पाऊस झाल्यानंतर सक्षम समजली जाणारी ही यंत्रणा कोलमडतेच कशी? अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. पुणे शहर हे सध्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. अशा महत्त्वाच्या शहरात किरकोळ बिघाडामुळे इतका वेळ वीज गायब होण, ही महावितरण प्रशासनाला न शोभणारी बाब आहे. गेल्या महिन्यात वसूलीचा आलेख चांगलाच घसरला आहे, त्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक व्यवस्थेवर होत आहे. सर्वसामान्य ग्राहक हा अधिकाऱ्यांना वीज गेली अथवा अन्य कारणांसाठी फोन करत असतो. मात्र; सर्वसामान्य ग्राहकांचे फोन घेण्यास काही अधिकारी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांची कोणतीही तमा न बाळगता अथवा त्यांचे कोणतेही कारण न ऐकून न घेता त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ताकसांडे यांनी या बैठकीत दिल्याचे महावितरणमधील सूत्रांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)