पुणे : ‘त्या’ लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याला जामीन

पुणे – जमिनीच्या प्रकरणामध्ये निकाल बाजूने देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकाऱ्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी तपासासाठी तपास अधिकाऱ्यासमोर सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत हजर राहणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय पुणे जिल्हा सोडायचा नाही आणि पुराव्यांमध्ये ढवळाढवळ करायची नाही, या अटींवर 1 लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचक्‍यावर विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा जामीन मंजूर केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीपती खंडू मोरे (वय 41, रा. भूसंपादन कक्ष क्रमांक 11, नवीन प्रशासकीय इमारत, पुणे) असे जामीन मिळालेल्याचे नाव आहे. त्याच्यासह खासगी व्यक्ती रामचंद्र पोपटराव खराडे (वय 45) यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती. नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूसंपादन कार्यालयात 8 मार्च रोजी दुपारी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना श्रीपती मोरे आणि त्याच्या साथीदाराला रंगेहाथ अटक केली होती.

सुरूवातीला न्यायालयाने श्रीपती याला पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यावेळी बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा आणि अॅड. सुहास कोल्हे यांनी त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने श्रीपती मोरे याला जामीन मंजूर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)