पुणे – तेजस्विनीची माहिती आता “ऑनलाईन’

पुणे – पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने (पीएमपीएमएल) दोन महिन्यांपुर्वी खास महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, त्याबद्दलच्या वेळापत्रकाची माहिती संकेतस्थळावर न दिल्याने महिला वर्गामध्ये नाराजी होती. याविरोधात अनेक तक्रारी पीएमपीकडे आल्या, याची दखल घेऊन प्रशासनाने संकेतस्थळ अद्ययावत केले असून बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे महिलांना तेजस्विनीबाबतची सर्व माहिती ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.

जागतिक महिला दिनी पीएमपीकडून खास महिलांसाठी तेजस्विनी गाडीची सुरवात करण्यात आली. नव्याने सुरू केलेल्या या बसला महिलावर्गाचा अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, तेजस्विनीचे वेळापत्रक पीएमपीच्या संकेतस्थळावर नसल्याने या बस केव्हा आणि कुठल्या मार्गावरून येतात हे महिलांना माहिती होत नव्हते. सध्या एकूण 10 मार्गांवर 32 बसेसमार्फत तेजस्विनीची सेवा दिली जात आहे. या मार्गांवर दररोज 236 फेऱ्या होत असून शेकडो महिलांना या सेवेचा लाभ होत आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांना संबंधित मार्गावरील बसेसच्या वेळा आता माहिती झाल्या आहेत. पण याच महिलांना इतर मार्गावर जायचे असल्यास त्याबाबत माहिती मिळत नसायची. तसेच कधीतरी बसने प्रवास करणाऱ्या महिलाही वेळापत्रकाबाबत अनभिज्ञ राहायच्या. तेजस्विनी सेवा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी प्रशासनाने या बसेसचे वेळापत्रक संकेतस्थळ तसेच ई-कनेक्‍ट ऍपवर टाकलेले नव्हते. ते फक्त मुख्य बसस्थानके, आगार आणि मुख्य कार्यालयातच पाहायला मिळते. यामुळे याविरोधात अनेक तक्रारी पीएमपीकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन प्रशासनाने तेजस्विनीचे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले आहे. यामुळे महिलांना आता बसबाबतची माहिती ऑनलाईन पीएमपीच्या www.pmpml.org या संकेतस्थळावर पाहायला मिळणार असल्याने महिलावर्गाने याचे स्वागत केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)