पुणे: तावडेच्या वकीलांचा न्यायालयात जामीनावर युक्तीवाद

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : 6 जुलै रोजी सीबीआयचे सरकारी वकील बाजू

पुणे- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याप्रकरणात सनातन संस्थेचा साधक विरेंद्रसिंह तावडे याला सीबीआयने केवळ संशयावरून अटक केली आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी बचाव पक्षाच्या वकीलांनी बुधवारी तावडेच्या जामिनावर युक्तीवाद करताना केली. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विरेद्रसिंह तावडे, विनय पवार आणि सारंग अकोलकर आणि इतरांच्या मदतीने दाभोलकरांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाल्याने दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात संत लोकांविरुद्ध, देवाबद्दल अनुदगार काढतात चमत्काराला आव्हान देतात याच कारणांमुळे त्याची हत्या करण्यात आल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले होते.
सीबीआयने 1 जून रोजी विरेंद्रसिंह तावडे याच्या पनवेल येथील घरी तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता तसेच सारंग अकोलकर याच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीवरून सीबीआयने 10 जून 2016 ला तावडे याला अटक केली होती दरम्यान, कॉ गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तावडेला अटक केली होती. डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर हत्या झाली याप्रकरणी विविध साक्षीदारांचे साक्षीपुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले संशयितांचे फोटो, रेखाचित्रे, विरेंद्रसिंह तावडे याच्या घरी व सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मुलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे, हार्ड डिक्‍स जप्त करण्यात आल्या होत्या.

याप्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तावडे हा अटकेत असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, त्याच्या बोलण्यामध्ये तफावत आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही अद्याप जप्त करण्यात आली नाही. सीबीआयने केवळ संशयावरून तावडेला अटक केली आहे. उच्च न्यायालयाने त्याच्या आरोप निश्‍चितीसाठी स्थगिती दिली आहे. सीबीआयच्या तपासामध्येही प्रगती नसून त्यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील ऍड. समीर पटवर्धन यांनी केली. तावडेच्या जामीवर म्हणणे सादर करण्यासाठी सरकारी वकील मयांक मखिजा यांनी वेळ मागितला असून यावरील पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)