पुणे – …तर “रुपी’च्या हस्तांतरणाचा प्रश्‍न सुटणार

मालमत्ता व देणी हस्तांतरणाचा पर्याय


ठाणे जनता सहकारी बॅंक तयार

पुणे – विलिनिकरण करताना रुपी बॅंकेची मालमत्ता व देणीसुद्धा जर हस्तांतरण केली, तर रुपीच्या पाच लाख ठेवीदारांचा प्रश्‍न सुटण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने ठाणे जनता सहकारी बॅंकेने तयारी दर्शविली असून सहकार खात्याने त्याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी रुपी प्रशासकीय मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.

रुपी को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या विलिनिकरणाबाबत टीजेएसबी सहकारी बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेस यापूर्वीच प्रस्ताव सादर केला होता.ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बॅंकेच्या संपूर्ण विलिनिकरणाऐवजी फक्त मालमत्ता व देणी हस्तांतरण करण्याबाबतची सहकारी बॅंका व व्यापारी बॅंका यांच्या विलिनिकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे रुपी बॅंक व टीजेएसबी बॅंक यांच्यामधील हस्तांतरणादेखील लागू करावीत,अशी विनंती रुपीने रिझर्व्ह बॅंकेकडे केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकने रुपी बॅंक व टीजेएसबी सहकारी बॅंक यांनी संयुक्तपणे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर सहकार आयुक्तांनी पुढाकार घेऊन रुपी बॅंक व टीजेएसबी बॅंकेच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक आयोजित केली होती,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बैठकीत रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार रुपी बॅंकेची मालमत्ता व देणी टीजेएसबी बॅंकेकडे हस्तांतरित केल्यास रुपी बॅंकेच्या पाच लाखाहून अधिक ठेवीदारांचा प्रश्‍न समाधानकारकरित्या सुटेल, याबाबत एकमत झाले. त्यानुसार प्रशासकीय मंडळाने सहकार आयुक्तांच्या मध्यस्तीने हस्तांतरण प्रस्तावदेखील लागू करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडे प्रयत्न करावेत, अशी विनंती सहकार विभागाकडे यावेळी करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन सहाकार आयुक्तांनी दोन्ही बॅंकाच्या प्रतिनिधीनी यावेळी दिले, अशी माहिती रुपी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)